Roshan More
1905 - जम्मू काश्मीरचे नेत शेख अब्दुल्ला यांचा जन्म
1956 - भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. गाढा व्यासंग, मूलभूत व स्पष्ट विचार, कृतिशील लढाऊ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी मोठी चळवळ उभारली. केंद्रीय कायदेमंत्री या नात्याने भारताच्या राज्यघटनेचा मसुदा, लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात जाहीर प्रवेश, अशा महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या मालिकेमुळे त्यांचे सर्वच आयुष्य मोठे घटनापूर्ण होते.
1976 - बेचाळीसच्या लढ्यातील पत्री सरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन
1992 - अयोध्या येथील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद वास्तू कारसेवकांनी जमीनदोस्त केली. उत्तर प्रदेश विधानसभा विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू.
1993 - पाच प्रमुख रेल्वेगाड्यांमध्ये एकाच दिवशी बाँबस्फोट सिंकदाबाद दिल्ली आंध्र एक्स्प्रेस, हावडा दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, मुंबई दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, दि्ली हावडा राजधानी एक्स्प्रेस आणि सुरत मुंबई फ्लाईंग राणी या गाड्यांमध्ये झाले होते स्फोट
2000 - ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
2013 - दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पुरस्कार विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन