Aslam Shanedivan
भाजपचे 'संकटमोचक' समजले जाणारे गिरीश महाजन सतत चर्चेत असणारे राजकारणी आहेत.
याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करत असल्याने चर्चेत असत.
पण मध्यंतरी असो किंवा आता ते त्यांचा डान्स आणि ढोल वाजवण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आले आहेत.
याआधी त्यांनी रामनवमीच्या मिरवणुकीत डीजे व ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला होता. तसेच डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात निघालेल्या रॅलीत देखील त्यांनी तुफान डान्स केला होता.
यानंतर आता त्यांचा नाशिकमध्ये गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत वेगळाच बाज पाहायला मिळाला आहे.
नाशिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंत्री महाजन यांनी आरती केली.
या दरम्यान मुसळधार पावसाची सरी बरसत अशतानाही त्यांना ढोल वाजविण्याचा मोह आवरलं नाही. भर पावसात त्यांनी ढोल वाजून मिरवणुकीला सुरुवात करून दिली.
त्यांच्याबरोबर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनाही ढोल वाजविण्याचा आनंद लुटला.