Roshan More
चीनच्या दौऱ्यामुळे रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे चर्चेत आहेत.
पुतिन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी लेनिनग्राड येथे झाला.
पुतिन यांनी आपले प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेतून पूर्ण केले.
१९७० मध्ये त्यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला.
येथे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
१९७५ मध्ये पुतिन यांनी कायद्यात पदवी (Law Degree) मिळवली.
पुतीन यांना शिक्षणादरम्यान कायदा आणि राजकारण यांचा परस्परसंबंधाचे महत्त्व कळले होते. त्यामुळे त्यांनी याचा खोलवर अभ्यास केला आणि पुढे त्यांना त्याचा फायदा राजकारणात झाला.