सरकारनामा ब्यूरो
मुरलीधर मोहोळ यांच्यासह जगदीळ मुळीक यांच्याकडेही लोकसभेचे प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जात होते.
निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळांना तिकीट मिळाले आणि त्यातच पुन्हा जगदीश मुळीक यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे आगामी लोकसभा निवडणूक ही पुणे मतदारसंघातून लढवणार आहेत.
मुरलीधर मोहोळ यांच्यासह माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि अन्य नावांचीही लोकसभेसाठी चर्चा सुरू होती.
आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती.
भाजपच्या उमेदवारांची महाराष्ट्रातील पहिली यादी बुधवारी जाहीर झाली. त्यात मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आले.
अशातच माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
चर्चेचा विषय ठरलेल्या सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
जनतेच्या सेवेत कायमच असणार, असे म्हणत त्यांनी समर्थकांचे आभारही मानले आहेत.
R