सरकारनामा ब्यूरो
मूळच्या भोपाळ येथील ईशा पंत या 2011 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
2012 मध्ये त्यांना भारतीय पोलिस सेवेतील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून पुरस्कार मिळाला होता.
कुटुंबातील सगळे सदस्य उच्च पदस्थ अधिकारी असल्याने त्याही आपल्या पदावर चमकदार कामगिरी करत आहेत.
निर्भीड आणि बेधडक कार्यामुळे पोलिस प्रशासनात लेडी दबंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन चित्रपट निर्माते जय प्रकाश झा यांनी ईशा यांची विशेष भेट घेतली.
ईशा यांचे कर्तृत्व आणि अनुभव त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि त्यावर एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.
जय गंगाजल नावाच्या त्यांच्या या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्राने ईशा यांची भूमिका साकारली आहे.
एक तरबेज आणि प्रामाणिक अधिकारी असलेल्या ईशा यांची प्रियांकासह इतर अभिनेत्रींनीही प्रेरणा घेतली आहे.
चित्रपटातून त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचल्यापासून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
R