सरकारनामा ब्यूरो
उत्कृष्ट वकृत्त्व कौशल्याने प्रत्येक सभेला लोकांची गर्दी खेचणारे राजकीय नेते गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात.
राजकारणातील महत्त्वाच्या आणि लोकप्रिय नेत्यांपैकी गोपीनाथ मुंडे यांचे नाव प्रसिद्ध होते.
भाजपला जनतेच्या तळागळापासून ते राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसताना राजकारणात आपली उत्तम छाप उमटवत ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले.
ते मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे होते.
बीडच्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी महाविद्यालयीन संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणात पहिले पाऊल टाकले.
अन्यायाविरुध्द उभे राहत जनतेसाठी कायम लढणारे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे लोकनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
आई वडिलांसोबत त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून पुढचे 7 वर्षे सलग पंढरपूरची पायी वारी केली.