सरकारनामा ब्यूरो
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आमदार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी संस्कृती यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.
भाजप नेते राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्याचे आहेत.
कॉलेजच्या जीवनात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून राजकारणात प्रवेश केला.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक मोर्चे काढण्यात आले आहेत.
संस्कृती सातपुते या ही समाजसेवेत मागे न राहता जनतेसाठी काम करत आहेत.
माळशिरस येथील महिलांसाठी सामाजिक काम करणाऱ्या सक्रिय नेत्या आहेत.
संस्कृती आणि राम सातपुते हे दोघेही आपापल्या क्षेत्रात जनतेसाठी काम करत आहेत.
प्रत्येक उपक्रम, सण किंवा समारंभ असला तरी ते दोघे आनंदाने सहभागी होत दोघांनीही त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आहे.