Ganesh Thombare
माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा आज (ता.13 डिसेंबर) जन्मदिन आहे.
आयआयटीची पदवी असणारे ते देशातील पहिले आमदार होते.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रीकरांनी सुचवलं होतं.
गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रीकरांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
मनोहर पर्रीकरांची नेहमी साधी राहणी होती. ते 'कॉमन मॅन'चं मूर्तिमंत उदाहरण होते.
'आरएसएस'चे स्वयंसेवक, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षणमंत्री, असा त्यांचा प्रवास होता.
मुख्यमंत्री ते संरक्षणमंत्रिपदापर्यंत पोहोचूनही त्यांनी साधेपणा अखेरच्या श्वासापर्यंत जपला.
मुख्यमंत्री झाल्यानंतरही मनोहर पर्रीकर वडिलोपार्जित घरात राहायचे.
देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रीकरांना मिळाला होता.