Diya Kumari Love Story : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री राजकुमारींची अनोखी लव्ह स्टोरी; नोकराशी विवाह अन् 21 वर्षांनी...

Chetan Zadpe

राजवाड्यातील नोकराशी विवाह -

राजघराण्यातील विरोधामुळे राजकुमारी दिया यांनी 1994 मध्ये नरेंद्र सिंह यांच्याशी कोर्टात लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर ही गोष्ट दिया यांनी आई पद्मिनी देवी यांना सांगितली. तेव्हा जयपूर आणि राजस्थानमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली.

Diya Kumari | Sarkarnama

राजघराण्याचा वारसा -

राजकुमारी दिया या जयपूरचे माजी महाराजा सवाई भवानी सिंह आणि राणी पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी आहे. आपल्यात राजवाड्यात कामाला असणाऱ्या नरेंद्र सिंह यांच्या त्या प्रेमात पडल्या अन् दोघांनी गुपचूपपणे लग्न केलं.

Diya Kumari | Sarkarnama

परिकथेसारखी कथा -

दिया कुमारी यांनी स्वत: ब्लॉगमध्ये याचा उल्लेख करत आपलं लग्नाची बातमी सार्वजनिक केली होती. त्या लिहतात, "मी 18 वर्षांची असताना नरेंद्र सिंह राजावत यांना पहिल्यांदा भेटली. माझे लग्न नक्कीच एखाद्या परीकथेसारखे होते."

Diya Kumari | Sarkarnama

प्रामाणिकपण भावला -

राजकुमारी दियाने लिहिले की, "माझे पती चार्टर्ड अकाउंटंट होते. ते तीन महिने आमच्या अकाउंट्स विभागाचे काम पाहत होते. राजवाड्यात आम्ही पहिल्यांदाच भेटलो. त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून मी खूप प्रभावित झाले."

Diya Kumari | Sarkarnama

मैत्रीच्या पलीकडे नातं -

राजकुमारी दिया यांनी लिहिले की, "मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले नाही. अकाऊंट्सचं काम संपवून तो निघाला तेव्हा मला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटलं. त्याच्याशी नातं मैत्रीपेक्षा जास्त आहे हे मला जाणवलं. मी जेव्हा आईशी याबद्दल बोलले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

Diya Kumari | Sarkarnama

आईला धक्काच बसला -

आईला कळल्यानंतर आम्ही नेहमीच जयपूरच्या बाहेरच भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र आई-वडिलांची काळजीही मी समजून घेत होते. त्यामुळे नरेंद्रशी माझे नाते संपवण्याचाही प्रयत्न केला. आमचं बोलणंही बंद झालं.

Diya Kumari | Sarkarnama

आर्य समाजाच्या पद्धतीने विवाह -

त्या म्हणतात सहा वर्षे एकमेकांना ओळखल्यानंतर आम्ही दोघांनी १९९४ मध्ये आर्य समाज पद्धतीने लग्न केले. या विवाहाची न्यायालयात नोंदणीही करण्यात आली.

Diya Kumari | Sarkarnama

वर्षांचा संघर्ष -

राजपूत समाजाने राजकुमारी दिया कुमारी आणि नरेंद्र कुमार सिंग यांच्या लग्नाला विरोध केला कारण ते एकाच गोत्राचे होते. त्यामुळे राजा भवानी सिंह यांनाही राजपूत महासभेचे अध्यक्षपद सोडावे लागले. ही भांडणे सलग 19 वर्षे सुरू होती. या प्रेमकथेने काही वर्षांपूर्वी वेगळे वळण घेतले होते.

Diya Kumari | Sarkarnama

तीन अपत्ये -

यानंतर राजकुमारी दिया आणि नरेंद्र सिंह वेगळे झाले. यानंतर दोघांनी जयपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दोघांनीही संमतीने घटस्फोट घेतला. दिया कुमारी आणि नरेंद्र सिंह यांना दोन मुलगे पद्मनाभ सिंह, लक्ष्यराज सिंह आणि एक मुलगी गौरवी आहे.

Diya Kumari | Sarkarnama

NEXT : सर्वात जास्त ट्विटर (एक्स) फॉलोअर्स असलेले भारतीय राजकारणी; पाहा यादी एका क्लिकवर..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...