Deepak Kulkarni
मानवेंद्र सिंह हे राजस्थानमधील एक प्रमुख राजपूत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे सुपुत्र आहेत. ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
सिंह हे 2018 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, ते एप्रिल 2024 मध्ये PM मोदींच्या उपस्थितीत पुन्हा भारतीय जनता पक्षात परतले होते.
भाजपच्या तिकिटावर 2009 -2014 दरम्यान बारमेर-जैसलमेर मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते.पण वडील जसवंत सिंह यांचा भाजपमध्ये अवमान झाल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मानवेंद्र सिंह यांच्या पत्नीचं जानेवारी 2024 मध्ये एका कार अपघातात निधन झालं होतं. ज्यात तेही जखमी झाले होते.
सिंह यांचा राजस्थानच्या राजपूत राजकारणात आणि विशेषतः बारमेर पट्ट्यात मोठा प्रभाव मानला जातो. आता ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.
60 वर्षीय माजी खासदार मानवेंद्र सिंह यांचं नाव थेट नीरजा सिंह चारण यांच्याशी जोडले जात असल्यानंं यामुळे त्यांच्या आयुष्यात नवा वाद निर्माण झाला आहे.
एका लक्झरी कार कंपनीच्या शोरूममध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या नीरजा सिंह चारण यांचं वय ३७ वर्षे आहे. सिंह आणि नीरजा यांची पहिली भेट कार सर्व्हिसिंगवेळी झाल्याची माहिती समोर येत आहे.
नीरजा यांच्यासोबतचं नातं मैत्रीतून प्रेमात रुपांतरीत झालं. सिंह यांची पहिली पत्नी चित्रा सिंह यांच्या निधनानंतर मानवेंद्र हे मानसिकदृष्ट्या खचले होते.यावेळी नीरजा या त्यांच्या जास्त जवळ आल्या आणि त्यांना मोठा आधार दिल्याचं बोललं जातं.
मानवेंद्र सिंह आणि नीरजा यांची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. एका फोटोत तर सिंह आणि नीरजा एकमेकांना गळ्यात माळा घालताना दिसून येत आहेत. त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत .पण कुटुंबानं त्यांच्या नव्या नात्याला विरोध दर्शवला आहे.