सरकारनामा ब्यूरो
परतूर जिल्हा मतदारसंघाचे भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपले शिक्षण लोणीमधून पूर्ण केले.
बेधडक व्यक्तिमत्त्व असलेल्या लोणीकर यांनी पंचायत समितीमधून राजकिय प्रवासाला सुरुवात केली.
सुरुवातीला समितीचे सभापती म्हणून काम पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेवर त्यांची निवड झाली.
पाच वर्षे विधानसभेचे सदस्य राहिल्यानंतर ते विधानसभा निवडणूकीत निवडून आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी पाणीपुरवठा मंत्री पदावर काम पाहिले.
लोणीकर यांनी आत्तापर्यंत पाच निवडणुका लढवल्या. त्यापैकी तीनमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
महाराष्ट्रात पुराचे थैमान आले असताना आमदार लोणीकरांनी पूरग्रस्तांना मोठी मदत केली होती.
राजकीय कारकीर्द गाजवत असताना वैयक्तिक कारणांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही ते अडकले आहेत.
ठाम नेतृत्वाने सर्वांचे लक्ष खेचून घेणारे भाजप नेते लोणीकर हे त्यांच्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.