सरकारनामा ब्यूरो
देशातील कणखर नेत्यांपैकी एक असलेले नितीश कुमार यांनी आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत.
बख्तियारपूरच्या श्री गणेश हायस्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर बिहारच्या काॅलेजमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण करताच बिहारच्या स्टेट पॉवर होल्डिंग कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी केली.
2005 पासून बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर कार्यरत असणारे नितीश कुमार यांनी नोकरीतून राजीनामा देत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
1994 मध्ये त्यांनी जाॅर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केल्यापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला.
केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्रीव्यतिरिक्त रेल्वे आणि वाहतूक मंत्रालयही त्यांनी उत्तमरित्या सांभाळले आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलासह इतर प्रमुख पक्षांसोबत त्यांनी युती केली अन् बहुमतांनी सत्तेवर आले.
'मुन्ना' म्हणून ओळख असणारे नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ कार्य करणारे नेते आहेत.
2023 मध्येही त्यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
R