Ramdas Tadas: वयाच्या सत्तरीत भाजपचे माजी खासदार कुस्तीच्या आखाड्यात; असे आहे रामदास तडस यांच्या फिटनेसचे रहस्य

Mangesh Mahale

वयाच्या सत्तरीत असले तरी भाजपचे माजी खासदार तडस यांचे आजही कुस्तीशी असलेले नाते कायम आहे.

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

कुस्तीचा आखाडा असो की राजकीय मैदान वर्धा लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेले माजी खासदार रामदास तडस आजही कुस्ती खेळतात.

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

त्यांचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. देवळी येथे उभारलेल्या मैदानावर ते व्यायाम करतात.

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

वेगात धावणे जड जात असले तरी चालणे मात्र, दररोजचेच. मैदानाला सकाळी २५ चकरा ते मारतात

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

जवळपास अर्धातास चालल्यानंतर इतर व्यायामाला सुरूवात करतात. विशेषतः दंडबैठका काढण्यावर त्यांचा भर असतो.

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

उत्तम आरोग्य, उत्तम कार्य, या साध्या सूत्राने जीवन जगल्यास व्यक्ती आजार आणि इतर दुखण्यांपासून दूर राहतो, असे ते म्हणतात.

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

त्यांनी गिरविलेले कुस्तीचे डावपेच युवकांना सांगण्याचा ते प्रयत्न करतात. देवळी येथे कुस्तीचे मैदान आहे. येथे जाऊन युवकांना कुस्तीचे धडे देतात.

Ramdas Tadas Fitness Secret | Sarkarnama

पहिलवानाच्या हालचाली, तो कोणता डाव टाकणार ते कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण ते देतात. त्याचा लाभ होत असल्याचे खेळाडू सांगतात.

Ramdas Tadas Fitness Secret

NEXT: "इंटेलिजन्स ब्युरो"मध्ये नोकरी कशी मिळवावी?

येथे क्लिक करा