Pradeep Pendhare
लोकसभा 2024 निवडणुकीत अमेठीमधून भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव खूप चर्चेत आहे.
भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांपैकी एक स्मृती! टीव्ही अभिनेत्री म्हणून एकेकाळी खूप लोकप्रियता मिळवली.
एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही-शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधून स्मृती इराणी यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
2002 मध्ये स्मृती इराणी यांनी 'रामायण'मध्येही सीतेची भूमिका साकारली होती.
2011 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत प्रवेश केला.
सुरुवातीला अभिनय आणि राजकारणाचा समतोल राखला. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्या पूर्णवेळ राजकारणात सक्रिय झाल्या.
माझ्या पराभवात आणि विजयात नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलेल्यांचा मी सदैव ऋणी असल्याची स्मृती इराणी यांनी म्हटलं.
आनंद साजरा करणाऱ्यांचे अभिनंदन. 'जोश कसा आहे?' असे विचारणाऱ्यांना अजूनही बरच काही बाकी असल्याचं स्मृती इराणी यांनी सुनावलं.