Deepak Kulkarni
आम आदमी पार्टीत मोठी फूट पाडत राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेच्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपकडून याच राघव चड्ढांवर पक्षप्रवेशानंतर काही दिवसांतच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चड्ढा यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची राज्यसभेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
खासदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वातील या समितीत 10 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आपनं भाजप प्रवेश सर्व खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना अपात्र करण्याबाबतची मागणी करत सभापतींना पत्रही दिलं होतं.
सध्या राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण 10 खासदार आहेत. यापैकी 7 खासदार एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात जात असतील, तर ते कायदेशीरदृष्ट्या वैध मानले जाते.
राघव चड्ढा हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतलं आहे.
राघव चड्ढा यांनी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राशी लग्न केलं आहे. ते आम आदमी पार्टीचे पंजाबमधून राज्यसभेचे खासदार म्हणून गेले होते. त्यांनी आपल्या भाषणांमधून संसदेत छाप पाडली होती.