Vijaykumar Dudhale
मागील 2019 च्या निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तब्बल साडेचार लाख मतांनी निवडून आलेले गोपाळ शेट्टी यांचे तिकिट भाजपने कापले आहे. त्यांच्या जागी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना तिकिट देण्यात आले आहे.
उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना दुसऱ्यांना संधी देण्यास भाजपकडून नकार मिळाला असून त्यांच्या आमदार मिहीर कोटेचा यांना तिकिट देण्यात आले आहे.
उत्तर मध्य मुंबईतून सलग दोन वेळा निवडून आलेल्या पूनम महाजन यांनाही भाजपने यंदा तिकिट नाकारले आहे, या मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही, त्यांच्याऐवजी सोलापूरमधून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनाही भाजपने तिकिट नाकारले आहे, त्यांच्याऐवजी बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे.
अकोल्यातून संजय धोत्रे यांची उमेदवारी कापण्यात आली असून त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपकडून तिकिट देण्यात आले आहे.
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. पाटील यांच्या ठिकाणी स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.
तिकिट कापण्यात आल्यानंतर जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला जय श्रीराम करत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे.