Pradeep Pendhare
मनोज जरांगे पाटील यांची मराठा आंदोलकांवरील राज्यभरात दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी आहे.
मुंबईतील आंदोलनात दाखल हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन असून, तसा अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून घेतला आहे.Maratha protesters cases withdrawal (5)
राज्यभरात गेल्या दोन वर्षांत मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी एकूण 826 गुन्हे दाखल झालेले आहेत.
विविध समित्यांनी 311 गुन्हे मागे घेण्याची शिफारस असून, त्यात गंभीर स्वरुपाचे 38 गुन्हे मागे घेऊ नये असे सूचवलेले आहे.
परभणी 144, बीड 132, नांदेड 98, जालना 69, धाराशिव 53, हिंगोली 64 गुन्ह्यांचा समावेश आहे.
न्यायालयात एकूण 717 गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून, 52 गुन्हे तपासावर आहेत.
या एकूण गुन्ह्यांमध्ये 57 गुन्ह्यांमध्ये अंतिम अहवाल एबीसी समरी सादर करण्यात आलेली आहे.
जाळपोळ, तोडफोड, हत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा, संचारबंदीचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान असे गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत.
महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सरसकट गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही कधीपासून सुरू होते, याची आता उत्सुकता आहे.