Rashmi Mane
अचानक ओळखपत्राची गरज लागली तर काळजी नको. आता व्हॉट्सअँपवरून काही सेकंदात आधार कार्ड मिळवा.
आधार डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे डिजिलॉकर अकाउंट असणे आवश्यक आहे. नसल्यास डिजिलॉकर वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन नवीन अकाउंट तयार करा.
आधार डाउनलोडसाठी UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अॅपचा वापर केला जातो. पण आता व्हॉट्सअँप हा अधिक सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे.
+91-9013151515 हा MyGov Helpdesk चा अधिकृत व्हॉट्सअँप नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा.
नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअँप चॅट उघडा आणि HI लिहा. त्यानंतर चॅटबॉट विविध पर्याय दाखवेल.
चॅटबॉटमध्ये मिळालेल्या पर्यायांमधून DigiLocker Services वर क्लिक करा. तिथून आधार डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाइप करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
व्हेरिफिकेशननंतर डिजिलॉकरमध्ये सेव असलेले सर्व डॉक्युमेंट्स चॅटबॉट दाखवेल. यातून आधार कार्ड निवडा.
काही सेकंदांत तुमचे आधार कार्ड व्हॉट्सअँपवर PDF फॉर्मटमध्ये मिळेल. त्यामुळे आता आधार बरोबर नसला तरी चिंता नको!