Sunil Balasaheb Dhumal
पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे.
सुनील देवधर, जगधीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव मानकर आदी बडे नेते भाजकडून पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
भाजपातील इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने पुण्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती.
या नावांच्या यादीतून आता पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव लोकसभेसाठी पुढे येत आहे.
मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
महापौर असताना मोहोळ यांनी पुणे शहरातील काम उल्लेखनीय होते.
मुरलीधर मोहोळांचे नाव चर्चेत अग्रक्रमांकावर असले तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.