Rajanand More
भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाला होता. ते सुरूवातीची सहा वर्षे म्हणजे 1980 ते 86 या काळात अध्यक्ष होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वाधिक काळ काम केले. वाजपेयींनंतर दुसरे अध्यक्ष. 1986 ते 91, 1993 ते 98 आणि 2004 ते 05 या कालावधीत ते अध्यक्ष होते.
मुरली मनोहर जोशी यांना केवळ दोन वर्षांचा कालावधी मिळाला. ते 1991 ते 93 या कालावधीत अध्यक्ष होते.
लालकृष्ण अडवाणींच्या पाच वर्षांच्या कालावधीनंतर कुशाभाऊ ठाकरे यांना संधी मिळाली. ते 1998 ते 2000 असे दोन वर्षे अध्यक्ष राहिले.
बंगारू लक्ष्मण यांना अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी केवळ एक वर्षे मिळाले. ते 2000 ते 01 या कालावधीत होते.
बंगारू लक्ष्मण यांच्याप्रमाणेच जन कृष्णमुर्ती हेही केवळ एक वर्षे अध्यक्ष होते. 2001 ते 02 यावर्षी त्यांनी या पदावर काम केले.
ठाकरे यांच्यानंतर वेंकैया नायडू यांना दोन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. ते 2002 ते 04 या कालावधीत अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर 2004 ते 05 मध्ये पुन्हा अडवाणी अध्यक्ष बनले.
अडवाणीनंतर राजनाथ सिंह यांना अध्यक्षपद भूषवण्याची दोनदा संधी मिळाली. ते 2006 ते 2009 आणि 2013 ते 2014 या काळात त्यांनी काम केले.
नितीन गडकरी हे जवळपास चार वर्षे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांना 2009 ते 13 या कालावधीत काम काम करण्याची संधी मिळाली.
अमित शाह पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर भाजपला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. ते. 2014 ते 20 असे सहा वर्षे अध्यक्ष होते.
नड्डा 2020 पासून पक्षाचे अध्यक्ष आहेत. मागील वर्षीचं त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना मुदतवाढ दिली आहे. आता ते केंद्रीय मंत्री बनल्याने नवीन अध्यक्ष लवकरच मिळणार आहेत.