Rashmi Mane
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी विजयी झाले.
गोवाल पाडवी हे महाराष्ट्रातील सर्वात तरूण खासदार आहेत.
नंदूरबार मतदारसंघातून निवडून आलेले गोवाल पाडवी यांचं वय अवघं 31 वर्ष आहे.
शहादा मतदारसंघ शहादा व तळोदा या दोन तालुक्यांत विभागला गेला आहे. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होतं.
आदिवासीबहुल भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे.
गोवाल पाडवी यांचे लहानपणापासून मुंबईत होते त्यांचे शिक्षणही मुंबईतच झाले.
गोवाल यांनी 'लॉ'मध्ये शाखेत पदव्युतर शिक्षण घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीही केली आहे.
के. सी. पाडवी जेव्हा आदिवासी विकास मंत्री झाले त्यानंतर गोवाल पाडवी हे नंदुरबारमध्ये परतले.