Pradeep Pendhare
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेते तथा भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रयागराज इथं महाकुंभला हजेरी लावली.
मंत्री राधाकृष्ण विखेंनी यावेळी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले.
मंत्री विखेंनी यावेळी भगवेवस्त्र परिधान केलेला पेहराव पाहायला मिळाला.
पवित्र स्नान करताना मंत्री विखेंनी, 'हर हर गंगे....नमामी गंगे!', असा जयघोष केला.
गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात भक्ती, शक्तीबरोबरच सकारात्मक ऊर्जेचे समाधान मिळाल्याचे मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया.
पवित्रस्नानानंतर मंत्री विखे यांनी अयोध्यामधील प्रभू श्रीरामलला मंदिरात जात दर्शन घेतले.
राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये प्रवेश केला.
शिस्तप्रिय भाजपमध्ये राधाकृष्ण विखेंचा केंद्र ते राज्यातील भाजप सरकारमध्ये दिग्गज नेत्यामध्ये दांडगा संपर्क आहे.