Mangesh Mahale
नियमित खेळ,व्यायामामुळे मन प्रसन्न राहते, सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते, असे मत अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
आमदारकीच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच आरोग्याकडेही त्यांचे विशेष लक्ष असते.
अर्धा तास सूर्यनमस्कार, योगासने आणि हलके पळणे असा त्यांचा व्यायाम करतो. कधीकधी क्रिकेटचा सरावही करतात.
कॅरमने एकाग्रता वाढते, क्रिकेटने सहकार्य आणि नेतृत्व विकसित होते. खोखो हा खेळ त्यांना विशेष आवडतो.
खोखो संघातील सर्व खेळाडू मिळून त्याला बाद करू शकतो. ही सांघिकतेची खरी शिकवण असल्याचे त्याचे मत आहे.
राजकारणात निर्णयक्षमता आणि सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य यांची गरज असते. त्यासाठी हा गुण नक्कीच फायद्याचा ठरतो.
निरोगी शरीर हा महत्त्वाचा घटक आहे. तरुणांनी रोज किमान अर्धा तास कोणताही खेळ खेळला पाहिजे.-गोरखे
स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे नसते, तर स्पर्धेसाठी केलेली तयारी महत्त्वाची असते आणि त्यातून व्यक्तिमत्त्व घडते, असे गोरखे म्हणाले.
NEXT: उपराष्ट्रपतींना मतदान करताना खासदार वापरतात खास पेन... निवडणूक आयोग ताकही फुंकून पिते