उपराष्ट्रपतींना मतदान करताना खासदार वापरतात खास पेन... निवडणूक आयोग ताकही फुंकून पिते

Rashmi Mane

उपराष्ट्रपती निवडणूक

उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे होते याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार मतदान करतात.

पक्ष-गठबंधन

दोन्ही सभागृहांमध्ये ज्यांचा बहुमत असतो त्या पक्ष-गठबंधनाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त असते. या वेळी एकूण 781 खासदार मतदान करत आहेत, तर विजयासाठी 352 मतांची गरज आहे.

अतिशय गोपनीय प्रक्रिया

मतदानाची प्रक्रिया अतिशय गोपनीय ठेवली जाते. खासदारांना मतदान करण्यासाठी सामान्य पेन वापरता येत नाही, तर निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलेल्या विशेष पेनद्वारेच मतदान करावे लागते.

विशेष पेन

या पेनमध्ये एक विशेष प्रकारची शाई असते जी पुसताही येत नाही आणि ना फिकट होते. जर कोणी साध्या पेनने मतदान केले तर ते मत अमान्य ठरते.

व्होट सिस्टम

उपराष्ट्रपती निवडणूक "सिंगल ट्रान्सफरेबल व्होट सिस्टम" या पद्धतीने घेतली जाते. यामध्ये खासदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला क्रमवारीत प्राधान्यक्रम द्यावा लागतो.

मोजणी प्रक्रिया

पहिली पसंती मोजल्यानंतर गरज पडल्यास दुसऱ्या पसंतीची मतं तपासली जातात. यामुळे निकाल अधिक न्याय्य व प्रतिनिधिक ठरतो.

निवडणुकीची जबाबदारी

या निवडणुकीसाठी राज्यसभेचे महासचिव रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहतात. या वेळी पी.सी. मोदी यांच्याकडे ही जबाबदारी आहे.

निकाल जाहीर

संसद भवनात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान होईल आणि साधारण दोन तासांनंतर निकाल जाहीर केला जाईल.

Next : सतेज पाटील यांना सत्तेत नसतानाही मिळणार लाल दिवा?

येथे क्लिक करा