Sachin Fulpagare
शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप शहराच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत गणपत गायकवाड यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कल्याणमधील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली होती.
बैठकीत भाजप पदाधिकारी गणपत गायकवाड यांच्या बाजूने ठाणपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी ही बैठक झाली होती.
कल्याण शहरनंतर आता कल्याण ग्रामीणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याण ग्रामीणच्या मलंगगड परिसरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत गणपत गायकवाड यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणी लवकरच वरिष्ठांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलीय.