Sunetra Pawar : बारामती लोकसभेसाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव : सुनेत्रा पवार

Vijaykumar Dudhale

30 डिसेंबर 1985 रोजी अजित पवारांशी विवाह

सुनेत्रा बाजीराव पाटील यांचा अजित अनंतराव पवार यांच्याशी 30 डिसेंबर 1985 रोजी विवाह झाला.

Sunetra Pawar | Sarkarnama

धाराशिव जिल्ह्यातील तेर हे माहेर

सुनेत्रा पवार यांचं माहेर हे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील असून, त्यांच्या घराण्यालाही राजकीय वारसा आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

काटेवाडीतून सामाजिक कार्याला सुरुवात

लग्नानंतर सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथून सामाजिक कार्याला सुरुवात केली. स्वच्छ, सुंदर व हरित काटेवाडीचे स्वप्न साकारले. काटेवाडीला पर्यावरण ग्राम पुरस्कारपासून राष्ट्रपतीकडून सुवर्णपदक मिळाले आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

पर्यावरण संतुलन व संवर्धनाचे काम

एन्व्हॉयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार या पर्यावरण संतुलन व संवर्धन विषयावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत.

Sunetra Pawar | Sarkarnama

बारामती हायटेक टेक्सटाइल्सच्या चेअरपर्सन

सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेक्सटाइल्सच्या चेअरपर्सन आहेत. टेक्सटाइल्समध्ये साडेतीन हजार महिला काम करतात.

Sunetra Pawar | Sarkarnama

सिनेट सदस्या

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठावर त्या सिनेट सदस्या म्हणून निवडून गेल्या आहेत.

Sunetra Pawar | Sarkarnama

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत, त्या माध्यमातून त्या शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत.

Sunetra Pawar | Sarkarnama

बारामतीच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक चर्चेतील नाव

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

R

Sunetra Pawar | Sarkarnama

स्वच्छ, निर्मळ व्यक्तिमत्त्व अन् काँग्रेसचे दिग्गज नेते...

Shivajirao Patil Nilangekar | Sarkarnama