Aslam Shanedivan
सध्या राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून ते नागपूरात सुरू आहे
दरम्यान अधिवेशनात विविध प्रश्न पटलावर येत असून सरकारवर विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील प्रश्नांची सरबत्ती करताना दिसत आहेत.
तर यावेळी विधीमंडळात अनेकांच्या उपस्थितीने मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशीच चर्चा सध्या गोपीचंद पडळकर यांची आहे
बंजारा समाजाचे नेते, ओबीसींचा बुलंद आवाज ते धनगर समाजाचा चोहरा म्हणून ओखळ असणारे गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत.
पडळकर यांनी नुकताच अधिवेशनात सांगलीच्या 'जत' तालुक्याचे नाव बदलून'देवभूमी' करा अशी मागणी केली आहे
अशातच गोपीचंद पडळकर पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्यावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनावेळी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले होते.