Ganesh Sonawane
राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.
उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी आमदार ढिकले यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं निदान झालं.
निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी बायप्सी झाली. या परिस्थितीतही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्या कुटुंबातील सदस्य वगळता अन्य कोणालाही या आजाराची कल्पना नव्हती असं ते सांगतात.
या परिस्थितीतही ते प्रचारासाठी दररोज साधारण वीस किलोमीटर पायी फिरायचे. ८८ हजार मतांनी ते निवडून आले.
निवडून आल्यानंतरही त्यांच्या तीन केमोथेरपी झाल्या. त्यामुळे शरीराची ठेवण बदलली, केस गळाले.
त्यांच्या यापूर्वी बायपास व मेंदू अशा दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या सर्व आजारांवर मात करून ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.
ते मुळात पैलवान आहे. सातवी-आठवीपासून ते नाशिकच्या दांडेकर तालमीत व्यायाम करायचे. राज्यात अनेक कुस्त्याही त्यांनी जिंकल्या आहेत.
लोक विचारतात, “तुला कॅन्सर होता हे जाणवलंच नाही, कसं?” तेव्हा ते अभिमानाने सांगतात – व्यायामामुळेच ही लढाई जिंकली.
व्यायामामुळे शरीर पिळदार तर झालेच, आत्मिक शक्ती वाढली. त्या आत्मिक शक्तीच्या बळावरच मी आजारांना सामोरे गेलो असं ते सांगतात.