मंत्र्यांच्या बैठकीतच आमदाराला हृदयविकाराचा झटका; काल वाढदिवस साजरा, आज निधन

Rajanand More

श्याम बिहारी लाल

उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार श्याम बिहारी लाल यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक

योगी सरकारमधील पशुधन मंत्री धर्मपाल सिंह यांची आज सक्रिट हाऊसमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीत लालही सहभागी झाले होते.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

हृदयविकाराचा झटका

बैठक सुरू असतानाच लाल यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

कालच वाढदिवस

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदारांनी आपला वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणेच आजही त्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

दुसऱ्यांदा आमदार

आमदार लाल हे फरीदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते २०२२ च्या निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. २०२७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली होती.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

इतिहास घडविला

फरिदपूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून एकाही आमदाराला सलग दुसऱ्यांदा विजय मिळालेला नाही, असा इतिहास आहे. मात्र, लाल यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

इतिहासाचे प्राध्यापक

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी लाल हे रुहेलखंड विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यामुळे राजकारणातही प्रोफेसर म्हणूनच त्यांची ओळख होती.

Prof. Shyam Bihari Lal | Sarkarnama

योगींकडून आदरांजली

आमदार चौधरी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांचे आकस्मिक निधन अत्यंत दु;खद असल्याचे सांगत त्यांनी श्रध्दांजली वाहिली. 

yogi adityanath.jpg | sarkarnama

NEXT : निवडणुकीच्या तोंडावर प्रसिध्द अभिनेत्रीचा भाजपला रामराम; लढविली होती विधानसभा निवडणूक...

येथे क्लिक करा.