Rajanand More
पश्चिम बंगालमधील भाजप नेत्या व प्रसिध्द अभिनेत्री पर्णो मित्रा यांनी पक्षाला नुकतीच सोडचिठ्ठी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
पर्णो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पर्णो यांची तृणमूलमध्ये घरवापसी झाली आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी तृणमूलला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा त्या टीएमपीमध्ये परतल्या आहेत.
२०२० मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढविली होती. पण तृणमूलच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव.
भाजपमध्ये जाऊन चूक केल्याची भावना पर्णो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यक्त केली. आता ही चूक सुधारत असल्याचेही त्या म्हणाल्या.
पर्णो या बंगालमधील प्रसिध्द अभिनेत्री असून अनेक बंगाली चित्रपट व टीव्ही मालिकांमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.
पर्णो यांच्या पक्षप्रवेशामुळे तृणमूल काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. प्रामुख्याने शहरी भागात बंगाली अभिनेत्रींचा चाहता वर्ग मोठा आहे.
भाजपने पर्णो यांच्या जाण्याने पक्षाला कसलेही नुकसान होणार नाही, असे म्हटले आहे. निवडणुकीतील पराभवानंतर त्या पक्षात सक्रीय नव्हत्या, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.