Deepak Kulkarni
आपण भारतीय लोकं राजकारणाशी असे काही जोडले गेलो आहोत की,निवडणूक कोणतीही असो आपला उत्साह,जोश जबरदस्त असतो.
राजकीय नेतेमंडळी निवडणूक जिंकण्यासाठी प्रचारात वेगवेगळे हटके फंडे वापरतात.
आता हरयाणाच्या राजकीय आखाड्यातून महत्त्वाची बातमी समोर येत असून रेवाडीमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
रेवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या महिला आमदारानं प्रचारादरम्यान दिलेलं हटके आश्वासन चर्चेचा विषय ठरले आहे.
हरयाणातील पटौदी मतदारसंघाच्या भाजप आमदार बिमला चौधरी यांनी प्रचारावेळी 'मतदान करा, लग्न लावून देते', असं आश्वासन दिलं होतं. त्यांचं हे आश्वासन निवडणुकीत चांगलंच गाजलं आहे.
चौधरी यांनी रेवाडीत प्रचारावेळी याठिकाणचा कोणताही मुलगा अविवाहित राहणार नसून तुम्ही भाजपला मतदान करा, मी तुमच्या सर्वांची लग्ने लावून देते. पण आधी मत द्या, मग नवरी मिळवा अशी थेट ऑफरच युवकांना दिली होती.
विशेष म्हणजे यावेळी प्रचाराच्या स्टेजवर मंचावर हरियाणाच्या आरोग्यमंत्री आरती रावही उपस्थित होत्या.
भेटण्याचं आवाहन
आमदार विमला चौधरी यांनी आता भाजपने रेवाडी नगर परिषद निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर आपलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. त्यांनी अविवाहित तरुणांना बायोडाटासह त्यांना भेटण्याचं आवाहन केलं आहे.