MLC Candidate : ‘आयात’ उमेदवारांवर भाजपची भिस्त; कोणत्या पक्षातून आले, विधान परिषदेला कुठून लढत आहेत? पाहा एका क्लिकवर...

Aslam Shanedivan

MLC निवडणूक

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 11 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यात 6 उमेदवार मुळ भाजपचे नाहीत.

bjp mlc election candidates | sarkarnama

आयात उमेदवार

हे 6 उमेदवार इतर पक्षांतून आयात केले असून ते काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अपक्ष पार्श्वभूमी असलेले आहेत.

bjp mlc election candidates | sarkarnama

प्राजक्त तनपुरे

अहिल्यानगरचे प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देवून भाजपवासी झाले. आणि 24 तासात त्यांना उमेदवारी जाहीर झाली.

bjp mlc election candidates | sarkarnama

अमर राजूरकर

नांदेडच्या राजकारणात काँग्रेस उरली आहे का असा प्रश्न आता पडत असून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते 12 वर्षे काँग्रेसमध्ये होते.

bjp mlc election candidates | sarkarnama

बसवराज पाटील

धाराशीव-लातूर मतदारसंघातून बसवराज पाटील यांना भाजपची उमेदवारी दिली असून ते काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार आहेत.

bjp mlc election candidates | sarkarnama

अविनाश ब्राह्मणकर

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अविनाश ब्राह्मणकर यांना नाना पटोले यांच्या विरोधात लढण्याचे बक्षीस म्हणून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

bjp mlc election candidates | sarkarnama

राजेंद्र राऊत

शिवसेना आणि अपक्ष अशी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या माजी आमदार राजेंद्र राऊत यांना सोलापुरमधून भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली आहे.

bjp mlc election candidates | sarkarnama

धैर्यशील कदम

मूळ राजकीय पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाची असणारे धैर्यशील कदम यांना सांगली-साताराच्या उमेदवारी दिली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे.

bjp mlc election candidates | sarkarnama

Gopinath Munde Scheme : गोपीनाथ मुंडेंच्या नावानं शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली योजना; जी संकटकाळात कुटुंबाला ठरू शकते मोठा आधार

आणखी पाहा