Gopinath Munde Scheme: गोपीनाथ मुंडेंच्या नावानं शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली योजना; जी संकटकाळात कुटुंबाला ठरू शकते मोठा आधार

Deepak Kulkarni

'लोकनेते'

गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय,आक्रमक आणि जनमानसात 'लोकनेते' म्हणून तर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते होते.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

आयुष्यभर संघर्ष

तळागाळातील, विशेषतः वंजारी समाज आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. पण त्यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला होता.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

कृषी विभागाची योजना

मुंडे यांच्या अपघाती मृत्युनंतर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' राबवली जाते.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

योजनेचा मुख्य हेतू

या योजनेचा मुख्य हेतू हा शेती व्यवसाय करताना किंवा इतर कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार देणे हा आहे.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

अनुदान

राज्य सरकारच्या 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत' अपघाताच्या स्वरूपानुसार पात्र लाभार्थी कुटुंबाला सानुग्रह अनुदान दिले जाते.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

आर्थिक मदत

या योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळे / दोन हात / दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपघाताची नोंदणी करणे बंधनकारक आहे

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

'या' अपघातांसाठी योजना

शेती व्यवसाय त्यात विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती तसेच रस्ते वाहन अपघात यांसह इतर कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी ही योजना लागू होऊ शकते.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

मोठा आधार

या सर्व अपघातांमध्ये अनेकदा शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. त्यांच्या कुटुंबियांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळतो,आर्थिक संकट ओढावते. अशावेळी ही योजना मोठा आधार ठरू शकते.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी ७/१२ उतारा आणि ६-क, ६-ड फेरफार, एफ.आय.आर. (FIR) आणि घटनास्थळाचा पंचनामा,शवविच्छेदन अहवाल, वारसदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते पुस्तक, मृत्यूचा दाखला किंवा अपंगत्वाचा अधिकृत वैद्यकीय दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

Gopinath Munde Shetkari Apghat suraksha sanugrah anudan yojana | Sarkarnama

NEXT : आजपासून महिलांचे बँक खाते फुल्ल! 3000 मिळवून देणारी 'अन्नपूर्णा भंडार योजना' नेमकी काय आहे?

Annapurna Bhandar Scheme | Sarkarnama
येथे क्लिक करा...