India AI Impact Conference 2026 : इंडिया AI इम्पॅक्ट परिषद 2026; 'दिल्ली घोषणापत्र' नेमकं काय ठरलं, झटपट समजून घ्या!

Pradeep Pendhare

घोषणापत्राला मान्यता

‘इंडिया एआय इम्पॅक्ट परिषद-2026’ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या ‘नवी दिल्ली’ घोषणापत्राला अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्ससह 88 देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्यता दिली.

India AI Impact Conference | Sarkarnama

मानव कल्याणावर भर

‘एआय’च्या माध्यमातून मानव कल्याणाचा निर्धार बहुतांश देशांनी व्यक्त केला आहे, याचा माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंद व्यक्त केला.

India AI Impact Conference | Sarkarnama

सर्वजन हिताय...

घोषणापत्राच्या माध्यमातून 86 देश आणि दोन आंतरराष्ट्रीय संघटनांनी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या तत्त्वाला औपचारिक मान्यता दिली आहे.

India AI Impact Conference | Sarkarnama

समान लाभ

कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ संपूर्ण मानवजातीपर्यंत समानपणे पोहोचावा, हा या घोषणेचा मुख्य उद्देश ठरला.

India AI Impact Conference | Sarkarnama

आर्थिक विकास

आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी ‘AI’चा प्रभावी वापर करण्याबाबत जागतिक पातळीवर व्यापक सहमती एकमत झालं.

India AI Impact Conference | Sarkarnama

राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा सन्मान

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहु-हितधारक सहभाग मजबूत करणे, राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा सन्मान राखणे तसेच सुलभ आणि विश्वासार्ह चौकटींतून AIचा विकास घडवण्यावर भर राहणार.

India AI Impact Conference | Sarkarnama

प्रमुख स्तंभ

‘एआय’ संसाधनांचे लोकशाहीकरण, आर्थिक विकास व सामाजिक कल्याण, सुरक्षितता व विश्वासार्ह, विज्ञान, सामाजिक सक्षमीकरण अन् मानवी संसाधन विकासासाठी साठी ‘AI’.

India AI Impact Conference | Sarkarnama

मोठे स्थित्यंतर

आर्थिक परिवर्तनाला चालना, ओपन सोर्स, सुलभ AI संस्थांना महत्त्व, विज्ञान, प्रशासनात ‘AI’चा प्रभाव वाढेल AND दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय भागीदारीस बळ.

India AI Impact Conference | Sarkarnama

घोषणापत्रास यांचीही मान्यता

अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, इस्राईल, ब्राझील, जर्मनी, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, सिंगापूर, श्रीलंका यांच्यासह युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी.

India AI Impact Conference | Sarkarnama

NEXT : एसटीचं महिलांसाठीचं अर्ध तिकीट...

येथे क्लिक करा :