Jagdish Patil
कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आलं.
या घटनेमुळे देशभरातून दु:ख आणि निराशा व्यक्त केली जात आहे. स्पर्धेसाठी ठरवण्यात आलेल्या निकषापेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं.
विनेशला सुवर्णपदक मिळवण्याची मोठी संधी होती पण केवळ 100 ग्रॅममुळे तिच्या हातून ती निसटली. या घटनेवर संपूर्ण देश दु:ख व्यक्त करत आहे.
PM नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी अशा दिग्गज नेत्यांनी या प्रकरणावर दु:ख व्यक्त करत विनेशला धीर देत आहेत.
मात्र, अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी या प्रकरणा संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल झाल्या आहेत.
हेमा मालिनी म्हणाल्या, "केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिला अपात्र घोषित केलं हे आश्चर्यकारक आहे. यावरून लक्षात येते की वजन नियंत्रणात ठेवणे किती महत्त्वाचे आहे."
हा आपल्या सर्वांसाठी धडा आहे. तिने 100 ग्रॅम वजन पटकन कमी करावे, अशी माझी इच्छा आहे, पण आता तिला काही मिळणार नाही, असं त्या म्हणाल्या.
विनेशचं अपात्र ठरणं ही संपूर्ण देशासाठी दु:खद गोष्ट होती. मात्र, अशा संवेदनशील प्रकरणावर बोलताना हेमा मालिनी हसत हसत होत्या, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं.