Mangesh Mahale
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार व्यक्तींची राज्यसभेसाठी निवड केली आहे. यात सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे.
केरळमधील प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.
त्रिशूर जिल्ह्यातील पैरमंगलममधील शाळेत ते 1999 पासून सामाजिक विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत.
केरळमधील राष्ट्रीय अध्यापक संघाचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या ‘देशीय अध्यापक वार्ता’ या नियतकालिकाचे संपादक आहेत.
त्यांचे दोन्ही पाय तोडण्यात आले. कम्युनिस्टांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे, सध्या ते कृत्रिम पायावर चालतात.
कवि अक्किथम यांच्या कवितांनी प्रभावित होऊन ते आरएसएसचे समर्थक झाले.
१२ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले आणि स्वयंसेवक बनले.
'सदानंदन मास्टर'या नावानं लोकप्रिय आहेत.
2016, 2021 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार होते. पण त्यांचा पराभव झाला.