Rashmi Mane
9.8 कोटींहून जास्त शेतकरी 20 व्या हप्ताची वाट बघत आहेत.
जुलै महिना संपूनही 15 दिवस उलटले, पण अद्यापपर्यंत पंतप्रधान किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये बँक खात्यात आलेले नाहीत.
त्यातच आता नवीन अपडेट समोर आली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढत आहे. यापूर्वी असा दावा केला जात होता की 20 जून रोजी पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 वा हप्ता जमा करतील.
जुलै महिन्याला आता 15 दिवस उलटून गेले असले तरी अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 19 जुलैला येऊ शकतो.
आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 19 हप्ते आले आहेत. या सर्व हप्त्यांची घोषणा स्वतः पंतप्रधान मोदींनी केली होती.
त्यामुळे 18 जुलै ला होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या बिहारमधील मोतिहारीतील सभेत, 20 व्या हप्त्याची घोषणा करू शकतात.