सरकारनामा ब्यूरो
भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या गुरुवारी (ता.27) हे पत्नी शिवश्री स्कंदप्रसाद हीच्यासह संसद भवनात आले होते.
तेजस्वी - शिवश्री पहिल्यांदा संसद भवनात आल्याने, अनेक नेत्यांच्य अन् उपस्थितांच्या नजरा या दापत्यांवर होत्या. अनेकांनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले.
तेजस्वी सूर्या हे संगीतकार,नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्यासोबत 6 मार्च रोजी बेंगळूरमध्ये पारंपारिक पद्धतीने विवाह बंधनात अडकले.
त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तेजस्वी सूर्या आणि शिवश्री स्कंदप्रसाद यांच्या विवाहाला अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
तेजस्वी सूर्या हे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदासंघातील भाजप पक्षाचे खासदार आहेत. ते भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
शिवश्री यांनी बायोइंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि मद्रास विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.