Mayur Ratnaparkhe
दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदासंघातील भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या हे विवाहबंधनात अडकले आहेत.
तेजस्वी सूर्या यांनी संगीतकार प्रसिद्ध नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्यासोबत विवाह केला आहे.
सोशल मीडियावर तेजस्वी सूर्या यांच्या विवाहाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
तेजस्वी सूर्या यांच्या विवाहास अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.
तेजस्वी सूर्या दोनदा लोकसभा खासदार झाले असून, भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत.
तेसजस्वी सूर्या आणि शिवश्री यांचा विवाह बंगळुरूत पारंपारिक रितीरिवाजानुसार संपन्न झाला.
तेजस्वी सूर्या हे भाजपचे फायरब्रॅण्ड नेते आहेत.
2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बेंगळुरू दक्षिणमधून मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि सर्वात तरुण खासदारांपैकी एक बनले.
२०२० मध्ये भाजपने त्यांना युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले.