सरकारनामा ब्यूरो
भारतरत्न सन्मान हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी यांची सुरुवात 2 जानेवारी 1954 मध्ये केली.
1971 पासून पहिल्यांदाच भारतात महिलेला भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात आले. हे एक ऐतिहासिक वर्ष होते. ज्यावेळी महिलांना या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले. 5 महिलांना हा सन्मान देण्यात आला आहे.
पहिल्या महिला पंतप्रधानांबरोबर इंदिरा गांधी या भारतरत्न मिळवणाऱ्याही पहिल्या महिला होत्या. 1971ला त्यांना हा सन्मान देण्यात आला.
इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी 1966 ते 1977 आणि 1980 ते 1984 या काळात देशाचे नेतृत्व केले.देशाच्या राजकारणात त्यांनी कणखर नेतृत्व बजावले. यामुळे त्यांनी भारतीय राजकारणात एक वेगळीच छाप टाकली.
मदर तेरेसा यांना 1980 ला त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी, भारतातील गरीब आणि कुष्ठरोग असलेल्या लोकांची निःस्वार्थ केलेल्या सेवेबद्दल भारतरत्न प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध कर्नाटकातील गायिका एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना 1988 मध्ये संगीत क्षेत्रातील पहिला संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील मोलाच्या योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या भूमिकेसाठी 1997ला अरुणा असफ अली यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.त्यांनी भारत छोडो आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली होती.
संपूर्ण जगात गान कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना 2001ला भारतरत्न देऊन गौरवण्यात आले होते.