Modi government decision : सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढीमागे मोदी सरकारचा मोठा डाव? अर्थकारण समजून घ्या...

Pradeep Pendhare

मुख्य उद्देश

सोने अन् चांदीवरील आयात शुल्क वाढवण्यामागे किंमतींचा मुद्दा नसून, भारताच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करणे हा मुख्य उद्देश मोदी सरकारचा आहे.

Modi government decision | Sarkarnama

सोन्यावरील आयात खर्च

2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा सोन्याचा आयात खर्च 71 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. कच्च्या तेलानंतर आयात खर्चात सोन्याचा वाटा सर्वाधिक आहे.

Modi government decision | Sarkarnama

थेट परिणाम

सोने आयात करण्यासाठी भारताला परकीय चलन (डॉलर) खर्च करावे लागते आणि याचा थेट परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर होतो.

Modi government decision | Sarkarnama

युद्धस्थितीचा फटका

रशिया-युक्रेन युद्ध आणि इराण संघर्षामुळे सोन्यात गुंतवणूक केल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून, भारताचे आयात बिलही वाढले आहे.

Modi government decision | Sarkarnama

भारताची बाजारपेठ

भारतामध्ये सोने घरगुती बचत आणि खर्चाचा महत्त्वाचा घटक असल्याने भारत देश हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारांपैकी एक आहे.

Modi government decision | Sarkarnama

आयात शुल्क खर्च

2024 आर्थिक वर्षात भारताचा सोन्याचा आयात खर्च 51.4 अब्ज डॉलर्स होता. 2023 मध्ये हा आकडा 45.54 अब्ज डॉलर्स होता. म्हणजेच 2024 मध्ये सोन्याची आयात 13.7 टक्क्यांनी वाढली.

Modi government decision | Sarkarnama

दर उच्चपातळीवर

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने, अंदाज होता, तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात शुल्क वाढवल्याने याचा मागणीवर परिणाम होऊ शकतो. सोने आणि चांदीचे दर आधीच उच्च पातळीवर आहेत.

Modi government decision | Sarkarnama

डाॅलरचा खर्च

जेव्हा कुटुंबं मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करते, तेव्हा सोन्याच्या आयातीसाठी अधिक डॉलर खर्च करावे लागतात.

Modi government decision | Sarkarnama

रुपया कमकुवत

वाढती चालू खाते तूट थेट रुपयाला कमकुवत करते, कारण देश जितके परकीय चलन कमावतो त्याहून अधिक खर्च करतो.

Modi government decision | Sarkarnama

यापूर्वीही उपाययोजना

आर्थिक तणावाच्या काळात भारताने यापूर्वीही अति प्रमाणातील सोन्याच्या आयातीला आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत.

Modi government decision | Sarkarnama

NEXT : ‘काटकसरी’चा मोदी मंत्र

येथे क्लिक करा :