Pradeep Pendhare
बिहारचे मंत्री नितीन नबीन यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करताना, पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष निवड होईपर्यंत ते पक्षाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारतील.
भाजप आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना वेगळा पगार देते का आणि नितीन नबीन यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळणार, याची चर्चा आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे पद संवैधानिक किंवा सरकारी पद नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वेतन दिले जात नाही. पक्षाध्यक्षांना सर्व आर्थिक मदत पक्षाच्या अंतर्गत निधीतून येते.
भाजपने राष्ट्रीय पक्षाध्यक्षाला किती वेतन दिले जाते हे सांगितले जात नसले तरी सूत्रानुसार महिन्याला एक ते दीड लाख रुपये मानधन दिले जाते.
सुविधांच्या बाबतीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांइतकेच विशेषाधिकार मिळतात.
पक्ष राष्ट्रीय अध्यक्षांना एक सुसज्ज अधिकृत निवासस्थानाबरोबरच, दिल्लीत एक कार्यालय दिले जाते.
जेपी नड्डा यांना सध्या झेड श्रेणीची सुरक्षा आहे. नितीन नबिन यांच्या सुरक्षा गृह मंत्रालयाकडून निश्चित करून, सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल.
पक्षाच्या कार्यक्रमांसाठीचा होणाऱ्या दौऱ्यांचा खर्च भाजप पूर्णपणे करेल. देशभरात प्रवासासाठी चालकाबरोबरच लक्झरी वाहने दिली जातील.