सरकारनामा ब्यूरो
हैदराबादमध्ये स्टार फुटबॅालपटू लियोनेल मेसीला भेटण्यासाठी पोहोचले राहुल गांधी. दोघांमध्ये रंगल्या गप्पा.
अर्जेंटीनाचा लोकप्रिय स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसी शनिवार (ता.13) डिसेंबर ला भारतात आला आहे. मेसी मागील 14 वर्षांत पहील्यांदाच भारतात आला आहे.
हैदराबादमध्ये हजारो प्रेक्षक मेसी ला पाहण्यासाठी आले होते. स्टेडियममध्ये मेसी बरोबरच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांंचे देखील 3D फोटोस झळकत होते.
लियोनेल मेसी ने राहुल गांधी यांना आपली स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली, राहुल गांधी यांनी स्वत: आपल्या इंस्टाग्रामवर लियोनेल मेसी सोबतचे फोटो शेअर केलेत, एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
लियोनेल मेसी ची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती, मेसी आल्याबरोबर त्याने प्रेक्षकांकडे पाहून हात उंचावले व एक झलक पाहण्यासाठी आलेल्या लोकांचे अभिवादन स्वीकारले.
स्टार फुटबॅालपटू लियोनेल मेसी याच्याबरोबर हैदराबाद मध्ये लुइस सुआरेज आणि रोड्रीगो डी पॉल हे फुटबॅालपटू देखील उपस्थित होते.
कलकत्ता येथे साल्ट लेक स्टेडियम मध्ये झालेल्या गोंधळामुळे केवळ 22 मिनिटात मेसीला स्टेडियम सोडाव लागलं होतं, परंतू हैदराबाद मध्ये सर्वकाही सुरळीत पार पडल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत मेसी फुटबॅाल खेळल्याचे माध्यमांवर पहायला मिळाले.