Pradeep Pendhare
भाजपने 18 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया होताच, राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
भाजपच्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तीला दोन वेळा अध्यक्ष म्हणून निवडले जाऊ शकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्याने अध्यक्षपदावर व्यक्तीची निवड होणार
संघटनेच्या गरजा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला संधी देण्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला दिला आहे.
दक्षिण भारतातील एकही नेता 20 वर्षांपासून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालेला नाही.
किमान 15 वर्षे पक्षाचे प्राथमिक सदस्य, इलेक्टोरल काॅलेजचे किमान 20 सदस्यांचे अन् पाच राज्यांमधून प्रस्ताव असावेत.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष जास्तीत जास्त 120 सदस्यांची राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती करतात.
13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, नऊ महासचिव, एक महासचिव संघटना 15 मंत्री आणि एक कोषाध्यक्ष नियुक्त करतात.