Pradeep Pendhare
बिहारच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये 1977 सक्रिय झाले. पटना विश्वविद्यालयात छात्र संघात सचिव म्हणून काम पाहिले.
भारतीय जनता पक्षात 1987 मध्ये सहभागी झाले. 1993 मध्ये हिमाचल प्रदेशमधून विधानसभा निवडणूक लढले.
हिमाचल प्रदेश सरकारमध्ये 1998 ते 2007 च्या दरम्यान जे. पी. नड्डा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कार्यरत होते.
2010 मध्ये त्यांना भाजपमध्ये राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्त मिळाली. यावेळी त्यांनी पक्षाच्या संघटनेची मजबूत बांधणी केली.
भाजपला 2014 मध्ये मिळालेल्या दमदार यशानंतर केंद्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली.
2019 मध्ये बिहारचे लोकसभा निवडणुकीचे प्रभारी होते. त्यावेळी भाजपने तिथे 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या.
20 जानेवारी 2020 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती मिळाली. भाजपचे ते अकरावे अध्यक्ष ठरले.
भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची गरज नसल्याचे विधान मे 2024 मध्ये करून धमाल उडवून दिली.
मोदी 3.0 सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी जे. पी. नड्डा यांना मिळाली आहे.