Rashmi Mane
UPSC क्रॅक करायची आहे, पण कोणता विषय घ्यावा हे माहीत नाही.
चला तर मग जाणून घेऊया UPSC उत्तीर्ण करण्यासाठी कोणता विषय सर्वांत उत्तम आहे?
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणं एवढं सोपं नाही, परीक्षा क्रॅक करायला उमेदवाराला प्रचंड मेहनत करावी लागले.
IAS होण्यासाठी उमेदवाराला UPSC परीक्षा देणं गरजेचं असतं.
त्यासाठी उमेदवाराला प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर इंटरव्हू अशा तीन स्टेज क्रॅक कराव्या लागतात.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जेवढ्या मेहनतीने अभ्यास करणं गरजेच आहे तेवढच महत्त्वाचं विषयाची निवड करणं आहे.
आयएएस अधिकारी होण्यासाठी आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ह्यूमॅनिटीज हा एक चांगला विषय असू शकतो.
ह्यूमॅनिटीज स्ट्रीममध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयाचा समावोश असतो. ज्याचा UPSC च्या तयारीसाठी चांगलाच फायदा होतो.