सरकारनामा ब्यूरो
बाॅलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौत यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कंगना या एक लोकप्रिय अभिनेत्री, तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिका आणि चित्रपट निर्मात्यादेखील आहेत.
सशक्त, स्त्रीकेंद्रित भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना या सामाजिक आणि राजकीय विषयांवर स्पष्ट बोलण्यासाठीदेखील ओळखल्या जातात.
पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कंगना यांचे आजोबा माजी आयएएस अधिकारी, तर पणजोबा आमदार होते.
डेहराडूनच्या डीएव्ही हायस्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतले. शालेय जीवनात त्या वादविवाद, वक्तृत्व आणि बास्केटबॉल खेळांमध्ये अव्वल होत्या.
सिमलाच्या सायन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीतील मॉडेलिंग आणि थिएटरमधून मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सुरू केला.
अरविंद गौर यांच्या अंतर्गत स्मिता थिएटर ग्रुपशी त्यांचा संपर्क होता. सोबतच त्या एक उत्कृष्ट कथ्थक डान्सरदेखील आहेत.
व्यावसायिक जीवनाच्या पलीकडे त्यांना स्वयंपाक, वाचन, लेखन, योगाभ्यास करणे आणि संगीत ऐकणे यांसारखे छंद आहेत.
भाजपला समर्थन करणाऱ्या या अभिनेत्री 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून अधिकृतपणे राजकारणात प्रवेश करणार आहेत.
R