Ganesh Sonawane
पाकिस्तानसोबतचा लष्करी संघर्ष संपुष्टात येत असल्याने, भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
जे.पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला तरी पक्षाला नवा अध्यक्ष सापडलेला नाही.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यासोबतच, जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारीचीही या महिन्याच्या अखेरीस घोषणा केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता दोनच नावे उरली आहेत. त्या दोन नावांचाच विचार केला जावू शकतो.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतील पहिलं नाव आहे भूपेंद्र यादव यांचे...
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतील दुसरं नाव धर्मेंद्र प्रधान यांचे आहे.
धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव हे ओबीसी समुदायातील असून दीर्घकाळापासून पक्षसंघटनेमध्ये सक्रिय आहेत.
भूपेंद्र यादव व धर्मेंद्र प्रधान या दोघांनीही याआधी विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे. परंतु मात्र अनुभव आणि संघटनेवरील प्रभावाचा विचार करता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.