Aslam Shanedivan
देशात केंद्रात आणि विविध राज्यात भाजपची सत्ता आहे. ओडीशा राज्यातही भाजपचीच सत्ता आहे.
येथील माझी सरकारने आमदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये तिप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यावरून आता जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
आता ओडिशा सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागण्याची शक्यता असून फेरविचार करावा अशी विनंती भाजप आमदारांनी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना केली आहे
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी दहा डिसेंबरला ओडिशा विधानसभेत एकमताने वेतनवाढीचे विधेयक मंजूर करणयात आला होता.
ज्यानंतर मुख्यमंत्री माझी यांना भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी दिल्लीला बोलावले होते. तसेच मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगत कानउघडणी करण्यात आली होती.
तर केंद्रीय नेतृत्वाची सल्लामसलत न करता असा मोठा निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत हा निर्णय मागे घेण्याचा बजावले होते.
आमदारांना 1.11 लाख रुपयांवरून 3.45 लाख, तर मुख्यमंत्र्यांना 3.74, उपमुख्यमंत्र्यांना 3.68 आणि विधानसभा अध्यक्षांना 3.62 लाख वेतन मिळणार आहे.
याशिवाय कॅबिनेट मंत्र्यांना 3.62 लाख, राज्यमंत्र्यांना 3.56 लाख, विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद यांना 3.62 लाख रुपये प्रत्येकी पगार मिळणार आहे.