Pankaja Munde : विधानसभेतील पराभव ते विधान परिषदेतील विजय; पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास कसा?

Akshay Sabale

मुंडेंचा विजय -

विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत.

pankaja munde | sarkarnama

पहिल्यांदा विधानसभेवर -

2009 मध्ये परळी मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर पंकजा मुंडे निवडून आल्या.

sarkarnama

प्रदेशाध्यक्ष -

2012 मध्ये पंकजा मुंडे यांच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपावण्यात आली.

pankaja munde | sarkanama

संघर्ष यात्रा -

1995 मध्ये युतीचं सरकार सत्तेत येण्यासाठी ‘संघर्ष यात्रे’चा मोठा वाटा होता. त्याच धर्तीवर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये ‘संघर्ष यात्रा’ काढली.

pankaja munde | sarkarnama

79 मतदारसंघ पिंजून काढले -

पंकजा मुंडे यांनी 'संघर्ष यात्रे'च्या माध्यमातून 600 रॅली आणि 3500 किमीचा रस्ता प्रवास करून 79 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले होते.

pankaja munde | sarkarnama

कॅबिनेट मंत्री -

त्यानंतर 2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये पंकजा मुंडेंची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली होती.

pankaja munde | sarkarnama

विधानसभा पराभव -

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला.

pankaja munde | sarkarnama

लोकसभा पराभव -

2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. पण, राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

pankaja munde | sarkarnama

विधान परिषद उमेदवारी -

त्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे.

pankaja munde | sarkarnama

NEXT : शिवसैनिक... उद्धव ठाकरेंचे 'पीए' अन् आता आमदार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milind Narvekar | Sarkarnama
क्लिक करा...